मिरज पूर्वभागामध्ये काँग्रेसला उभारी कधी? | पुढारी

मिरज पूर्वभागामध्ये काँग्रेसला उभारी कधी?

लिंगनूर ; पुढारी वृत्तसेवा :  मिरज पूर्वभागातील एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघ वगळता काँग्रेस पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. या भागात भाजपानंतर आता राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून, काँग्रेसला उभारी केंव्हा मिळेल, असा प्रश्न येथील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे.

सलग तीनवेळा विधानसभा आणि दोन वेळा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहिला आहे. त्यामुळे भाजपचा प्रभाव अजूनही येथे कायम आहे. काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, मंत्री विश्वजित कदम, जितेश कदम, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यावर काँग्रेसच्या बळकटीकरणाची जबाबदारी आहे.

लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. त्यामुळे या निवडणुकीत तरी काँग्रेस सक्रिय झाली तरच ती टिकून राहिल. अन्यथा पूर्वभागात काँग्रेसचे शांत धोरण काँग्रेसलाच आणखी पिछाडीवर नेऊ शकते.

त्यामुळे मंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला उभारी देण्याच्या दृष्टीने लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. तरच काँग्रेसचे अस्तित्व येणार्‍या सर्व निवडणुकांत दिसून येईल; अन्यथा पक्षाचे नेतेसुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक तिकीट वाटपावेळी दोलायमान होऊ शकतात, याचे भानही जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना ठेवावे लागणार आहे.

Back to top button