घटना वाचविण्यासाठी एकत्र आले पाहिजे: डॉ. बाबा आढाव यांचे आवाहन | पुढारी

घटना वाचविण्यासाठी एकत्र आले पाहिजे: डॉ. बाबा आढाव यांचे आवाहन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. सर्व विरोधी पक्षांनी अगोदर देशाची घटना वाचविण्याठी एकत्र आले पाहिजे,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी बुधवारी विरोधी पक्षांना केले.
ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

माजी आमदार उल्हास पवार, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, अ‍ॅड. जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. डॉ. आढाव म्हणाले, ‘आज नवा इतिहास घडवला जात आहे. त्याविरोधात काँग्रेस पक्ष उभा राहू शकत नाही. डावी चळवळ व इतर पक्षांची परिस्थिती बिकट आहे. आज देशातील घटना वाचविण्यासाठीसर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. एकजूट करण्याची गरज आहे. मात्र, या एकजुटीच्या पाठीमागे ‘जात’ नको. तर, सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र आले पाहिजे.’

‘दलित, आंबेडकरी चळवळीतील विखुरलेल्या घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र,ऐक्याचा विषय येतो, तेव्हा प्रत्येक जण जुने विषय काढतो आणि ऐक्याचा विषय तिथेच मागे पडतो. मात्र, आता सगळे थकले असून, एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. या विखुरलेल्या घटकांना एकत्र आणण्याचे नव्या पिढीने आक्रमकपणे केले पाहिजे,’ असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. डांगळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

डॉ. बाबा आढाव यांचे आवाहन
राहुल गांधींच्या विरोधात ईडी कारवाईचा प्रयत्न चालला आहे. त्या विरोधात काँग्रेसकडून देशभर मोर्चे काढले जात आहेत. मात्र, मोर्चे काढून ईडी कारवाई थांबणार नाही.

– डॉ. बाबा आढाव

हेही वाचा

‘अग्निपथ’मधील तरुणांना नोकर्‍यांमध्ये आरक्षण

वाहन परवाना चाचणी 22 जूनला बंद

मिरज पूर्वभागामध्ये काँग्रेसला उभारी कधी?

Back to top button