‘ध्वनीप्रकाश’चा देखावाच; शनिवारवाड्यातील यंत्रणा धूळ खात पडून | पुढारी

‘ध्वनीप्रकाश’चा देखावाच; शनिवारवाड्यातील यंत्रणा धूळ खात पडून

नितीन पवार

कसबा पेठ : जाज्वल्य मराठा इतिहासाची माहिती व्हावी याकरिता शनिवारवाड्यात पुणे महानगरपालिकेने सव्वाशे कोटी रुपये खर्चून ‘साउंड अँड लाईट शो’ची यंत्रणा बसवली. पालिकेच्या विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील शोची यंत्रणा धूळ खात पडली असून, धुळीने माखलेली आणि गंजलेली ही यंत्रणा पाहून हा शो आता निव्वळ देखावाच ठरल्याचे दिसून येत आहे.

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

शनिवारवाडा पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक येतात. येथील वास्तू पाहून त्यांच्या मनात मराठा इतिहासाविषयी उत्सुकता वाढते. साहजिकच हा लाईट अँड शो पाहण्यासाठी अनेक पर्यटक तिकीट काढण्यास तयार असतात. मात्र पालिकेच्या विद्युत विभागाकडून यंत्रणेची कोणतीही काळजी न घेण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून हा शो बंद असून, पर्यटकांच्या पदरी निराशाच येत आहे.

मुंबई : मानखुर्दमध्ये पुन्हा अग्नीतांडव; गोदामांना भीषण आग

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्त्व विभाग, नॅशनल कल्याण फंड आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून शनिवारवाडा येथे साउंड अ‍ॅन्ड लाईट शो कार्यक्रम सुरू झाला. मात्र अनेक वर्षांपासून हा शो बंद असल्याने देशी-विदेशी पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

राज्यात होणार आशियातील पहिले कायदा विद्यापीठ

ध्वनीप्रकाश विद्युत यंत्रणा उघड्यावरच

महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत शनिवारवाड्याच्या आतील कारंज्याची तसेच बैठक व्यवस्थेची (स्टेज) ध्वनीप्रकाश कार्यक्रमासाठी जी विद्युत यंत्रणा बसवण्यात आली आहे ती उघड्यावरच आहे. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांचा चुकून धक्का लागला, तर त्यांना विजेचा धक्का लागण्याची भीती आहे.

Ambani-Adani : अंबानी-अदानींना धक्का, 100 अब्ज डॉलर क्लबमधून बाहेर!

आसने तुटली; खुर्च्यांवर चढला गंज

येथील जी आसन व्यवस्था आहे, ती गेल्या दोन वर्षांपासून कुलूपबंद आहे. या आसनव्यवस्थेची योग्य देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. तरीही होत असलेल्या अनास्थेमुळे येथील बहुतांश खुर्च्यांना गंज चढला आहे. तसेच अनेक खुर्च्या तुटलेल्या आहेत. येथे नियमित होत नसलेल्या स्वच्छतेमुळे येथे पालापाचोळ्याचे ढीग जमा झाले आहेत. पक्ष्यांची त्यावर घाणही पडलेली दिसते. यावरून मागील 2-3 वर्षांपासून या परिसराची येथे स्वच्छता झाली नसल्याचे दिसून येत आहे.

Pankaja Munde : पंकजा मुंडे समर्थकांचा भाजप कार्यालयावर हल्ला

शनिवारवाडा प्रशासनाचा पालिकेकडे पाठपुरावा

या ‘साउंड अँड शो’ची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ते पाहून अनेक पर्यटक उत्साहाने शो बघण्यासाठी येतात. पण शो बंद आहे हे सांगितल्यावर त्यांचा हिरमोड होतो. त्यामुळे या शोची यंत्रणा अद्ययावत करून तो पुन्हा सुरू करावा यासाठी शनिवारवाडा प्रशासनाकडून पालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Back to top button