पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रचार गीतामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि फेरबदल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आम आदमी पक्षाने नुकतेच प्रचार गीत लाँच केले होते; परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र आपच्या या प्रचार गीतामध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. (Aam Aadmi Party)
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आम आदमी पार्टीला (AAP) केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 आणि ECI मार्गदर्शक तत्त्वांनुसार विहित केलेल्या जाहिरात संहितेनुसार, त्यांच्या निवडणूक प्रचार गीतातील सामग्री सुधारित करण्यास सांगितले आहे. फेरबदल केल्यानंतर हे प्रचार गीत पुन्हा आयाेगासमाेर सादर करावे, असाही आदेश दिला आहे. (Aam Aadmi Party)
आम आदमी पक्षाने नुकतेच त्यांचे लोकसभा प्रचार गीत लॉन्च केले होते. या दोन मिनिटांच्या या प्रचार गीतात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियाही दिसले. हे गाणे पक्षाचे आमदार दिलीप पांडे यांनी लिहिले आहे. दरम्यान 'आप'ने आयोगाचे हे पाऊल केंद्राची हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे. "जेल के जवाब मे हम वोट देंगे" हे गीत आक्रमक जमाव अरविंद केजरीवाल यांचा फोटो धरून गात असल्याचे दाखविण्यात आले आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांना कारागृहात दाखवले आहे, न्यायपालिकेवर आक्षेप घेतला आहे. पुढे, हा वाक्यांश ECI च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातीमध्ये अनेकवेळा आढळतो. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 अंतर्गत निर्धारित कार्यक्रम आणि जाहिरात कोडचे मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम 6(1\(g)," नुसार निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. (Aam Aadmi Party)
यासंदर्भात आपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री आतिशी म्हणाल्या की, प्रचार गीतात कुठेही भाजपचा उल्लेख नाही. मतदानाने तुरुंगात उत्तर देण्यास निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. या गाण्यावर बंदी घालावी, असे आक्षेपार्ह काहीही नाही. त्यामुळे या गाण्यातून कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.