

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीर्घकाळापासून जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत आपले स्थान निर्माण करणारे भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचे गेल्या 24 तासांत मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या दोन्ही उद्योगपतींची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या खाली आली असून दोघांमध्ये आता एकाच स्थानाचे अंतर राहिले आहे. (Ambani-Adani net worth below 100 Billion Dollar)
गुरुवारी वृत्त लिहिपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 1.82 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे समोर आले. या घसरणीनंतर अंबानींची संपत्ती 99.3 अब्ज डॉलरवर आली. रिलायन्सच्या शेअर्सच्या वाढीच्या जोरावर मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांचे वर्चस्व कायम असले तरी त्यांच्या निव्वळ संपत्तीत पुन्हा घट झाली आहे. सध्या अव्वल श्रीमंतांच्या यादीत अंबानी आठव्या क्रमांकावर आले आहेत. (Ambani-Adani net worth below 100 Billion Dollar)
टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतील दुसरे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगातील इतर श्रीमंतांना मागे टाकत भरपूर कमाई केली आहे, परंतु गेल्या काही काळापासून त्यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अदानी हे टॉप-10 श्रीमंतांमध्ये पाचव्या स्थानावर होते आणि आता ते नवव्या स्थानावर घसरले आहे. (Ambani-Adani net worth below 100 Billion Dollar)
इतर टॉप 10 श्रीमंतांबद्दल बोलायचे तर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. गेल्या 24 तासांत त्यांची एकूण संपत्ती 2.10 अब्ज डॉलरने वाढून 216 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. यानंतर अॅमेझॉनचे जेफ बेझोसही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.84 अब्ज डॉलरने कमी होऊन 145 अब्ज डॉलर झाली आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना गेल्या 24 तासांत 1.28 अब्ज डॉलरचे नुकसान झाले असून त्यांची संपत्ती 135 अब्ज डॉलरवर आली आहे. (Ambani-Adani net worth below 100 Billion Dollar)
बिल गेट्स 123 अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत चौथ्या, तर वॉरन बफे 112 अब्ज डॉलरसह पाचव्या क्रमांकावर आहेत. सहाव्या स्थानावर लॅरी पेज यांचे नाव आहे, त्यांची एकूण संपत्ती 106 अब्ज डॉलर आहे आणि सॅग्रे ब्रिन 102 अब्ज डॉलर संपत्तीसह सातव्या स्थानावर आहे. अदानी-अंबानी यांचे नाव आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, स्टीव्ह बाल्मर दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 95.5 अब्ज डॉलर इतकी आहे. (Ambani-Adani net worth below 100 Billion Dollar)