नाशिक : बिबट्याने चार वर्षीय बालिकेला नेले फरफटत | पुढारी

नाशिक : बिबट्याने चार वर्षीय बालिकेला नेले फरफटत

नाशिक; पुढारी वृत्‍तसेवा : बिबट्याने चार वर्षीय बालिकेला फरफटत नेले. ही घटना दिंडोरी तालुक्यातील जुने धागूर शिवारात घडली. एका शेतमजुराच्या चार वर्षीय बालिकेवर (रविवार) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने चार वर्षीय बालिकेला फरफटत नेले. या धक्‍कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. वनविभाग व ग्रामस्थ बालिकेचा शोध घेत आहेत.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जुने धागूर येथील एक द्राक्ष उत्पादक शेतकरी माळी यांच्या शेतात काम करण्यासाठी वनोली सुतारपाडा येथे आले होते. गुजरात येथील काही मजूर शेतमजुरीस आले असून, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेतावरील शेडमध्ये सदर मजूर स्वयंपाक करत होते.

यावेळी अचानक एक बिबट्या तेथे आला. चार वर्षीय बालिकेवर हल्ला करत बिबट्या तिला आळंदी धरणाच्या जंगलाच्या दिशेने फरफटत घेऊन गेला. या घटनेनंतर बालिकेची आई व इतर नातलगांनी टाहो फोडत तिचा शोध सुरू केला. ग्रामस्थांनी पोलीस व वन प्रशासनास या विषयी माहिती दिली. वनविभाग व ग्रामस्थ मुलीचा जंगलात शोध घेत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन; ३९ जणांना अटक

Back to top button