ना. रामराजे म्हणाले, कोणी कितीही नाचले तरी जिल्हा बँक आमचीच | पुढारी

ना. रामराजे म्हणाले, कोणी कितीही नाचले तरी जिल्हा बँक आमचीच

दहिवडी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँक निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, कोणी कितीही नाचले तरी जिल्हा बँक आमचीच असणार आहे. माण तालुक्यातील शेतकर्‍यांनी पीक कर्जाला विरोध करणार्‍यांना पुन्हा जिल्हा बँकेत पाठवू नये, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

दहिवडीतील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुख, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, अनिल देसाई, नीलिमाताई पोळ, व्हा. सुरेश इंगळे, जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव उपस्थित होते.

ना. रामराजे म्हणाले, माणमधील कोणीच आ. जयकुमार गोरे यांच्यावर बोलत नाहीत, मलाच बोलावे लागते. जिल्हा बँक ही देशातील नंबर एकची बँक आहे. तरीही याची तक्रार तुमच्यातल्या एकाने व आमच्यातल्या एकाने ईडीकडे केली होती.

तसेच ना. अमित शहा यांच्याकडेही गार्‍हाणे मांडले होते. चौकशी झाली, त्यात काहीच निघाले नाही. आमचा कारभार चोख आहे. आमच्या कारभारामुळे जिल्हा बँक देशात एक नंबर आहे. थोडे दिवस थांबा सगळ्यांचे बरोबर होईल, असा इशाराही त्यांनी आ. गोरे व खा. रणजितसिंह यांचा नामोल्लेख टाळून दिला.

Back to top button