आजच्या सभेला जमलेली गर्दीच विजयाची साक्षीदार : खा. महाडिक | पुढारी

आजच्या सभेला जमलेली गर्दीच विजयाची साक्षीदार : खा. महाडिक

कोल्हापूर : आजची ही सभा म्हणजे आमच्या विजयाची मुहूर्तमेढ आहे. उद्या याच विठ्ठल बिरदेवाच्या साक्षीने आम्ही विजयाचा भंडारा उधळू, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

करवीर तालुक्यातील वाशी गावामध्ये छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेत खासदार महाडिक बोलत होते.

यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना खासदार महाडिक म्हणाले, आजवर कोल्हापूर जिल्ह्याने महाडिक कुटुंबाला भरभरून दिले आहे. महाडिक कुटुंबानेही कोल्हापूर जिल्ह्याच्या सेवेत तीन पिढ्या दिल्या आहेत. असे असताना काही जण महाडिक बाहेरचे अशी टीका करतात. ही टीका करणारी मंडळी आपत्तीच्या वेळी मात्र लपून बसलेली असतात.

महाडिक प्रत्येक संकटात ठामपणे कोल्हापूरच्या मदतीसाठी उभे असतात. बंटी पाटील तुमचे एकेक कारनामे बाहेर काढले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. राजाराम कारखान्याच्या पारदर्शक कारभारावर बोलण्याची तुमची पात्रता नाही, अशा शब्दात खा. धनंजय महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

यावेळी माजी आमदार अमल महाडिक यांचेही भाषण झाले. सभेस नारायण पाटील, शिवाजी पाटील, शामराव तिबिले, महादेव बुडके, कल्पना पाटील, बी. ए. पाटील, सुनील कांबळे, हंबीरराव पाटील, विजय पाटील, दत्तात्रय मेडशिंगे, तेजस्विनी पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?