पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी घेतली गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ | पुढारी

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी घेतली गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ

पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज गुरूवारी (दि.१५) रोजी गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. गोव्यातील दोनापावला येथील राज्यभवनात हा सोहळा पार पडला.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांनी पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना शपथ दिली. या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर उपस्थित होते. पिल्लई हे गोव्याचे एकोणीसावे राज्यपाल आहेत.

अधिक वाचा 

या कार्यक्रमात गोव्याचा राज्यपाल या नात्याने मी कायदा आणि संविधानाचे रक्षण करेन. गोमंतकीय जनतेच्या कल्याणासाठी तत्पर असेन, अशी त्यांनी शपथ घेतली.

अधिक वाचा 

नवे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे मी गोव्यामध्ये स्वागत करतो. त्यांचा अनुभव मोठा असून त्याचा फायदा गोव्याच्या कल्याणासाठी नक्कीच होणार असल्याची प्रतिक्रिया या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

अधिक वाचा 

यापूर्वी गोव्याच्या राज्यपालपदाची प्रभारी जबाबदारी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे होती.

हेही वाचलंत का? 

पाहा : आता परदेशी फळं मिळणार मुंबईच्या टेरेसवर

Back to top button