मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १३ राज्यांच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत अव्वल  | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १३ राज्यांच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत अव्वल 

मुंबई, पुढारी ऑनलाईन : देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्री अनेक कारणांमधून चर्चेत असतात. उत्तर प्रदेश या भल्यामोठ्या राज्यापासून उत्तराखंडसारख्या छोट्या राज्यांपर्यंत या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अव्वल स्थान पटकावलं आहे.

‘प्रेश्नम’नं देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेची चाचणी घेण्यासाठी ‘मुख्यमंत्री त्रैमासिक मान्यता रेटिंग’, सुरू केला. त्यामध्ये पहिली यादी १३ राज्यांचा समावेश करण्यात आला होता.

त्यामध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांचा समावेश होता. यामध्ये एकूण ६७ टक्के भारतीय होते.

चाचणीच्या निकालात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली. या सर्वेक्षणात ४९ टक्के लोकांना ठाकरे यांची कामगिरी पसंत पडली. आम्ही पुन्हा ठाकरेंना मतदान करणार, अशी लोकांनी प्रतिक्रिया दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थान मिळवलेले आहे. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ४४ टक्के लोकांची पसंती मिळाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना ४० टक्के मतं मिळाली, ते तिसऱ्या स्थानावर आले.

१३ राज्यातील १७ हजार ५०० मतदारांचं सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढण्यात आला. तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्र्यांचं काम कसं वाटतं? त्यांच्या कामाची पद्धत आवडते का?, असे प्रश्न या चाचणीत विचारण्यात आले होते. योग्य पर्याय निवडायचा होता.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरात शिवसेना कशी रुजली? 

हे वाचलंत का?

Back to top button