

मुंबई; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष नाराज आहेत. नाना पटोले यांच्याकडून राष्ट्रवादी विरोधात वक्तव्ये सुरुच आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
अधिक वाचा :
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार चालत आहे. त्यामुळे ते रिमोट कंट्रोल आहेत. ते मोठे नेते आहेत. महाविकास आघाडी सरकार बनविण्यात पवारांची मोठी भूमिका राहिली आहे. असे पटोले यांनी म्हटले आहे.
आज काँग्रेसतर्फे महागाई विरोधात सायकल रॅली काढण्यात आली. आणि याबाबत राज्यपालांना निवेदनही देण्यात आले. यानिमित्ताने नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पटोलेंनी शरद पवार आमच्यावर नाराज नसल्याचे म्हटले.
अधिक वाचा :
इंधन दरवाढ आणि महागाईमुळे लोकांचे जगणं मुश्किल झाले आहे. त्यासाठी महागाई विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ओबीसी, मराठा आरक्षणाबाबत राज्यपालांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी केंद्राने डाटा द्यावा. अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची चिंता आहे. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये केवळ अडथळा आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. असा आरोप पटोले यांनी केला आहे.
अधिक वाचा :
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धोका झाला. तेव्हा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली होती.
त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे, अशी स्वबळाची भूमिका नाना पटोले यांनी बुधवारी मांडली होती. मी स्वबळाच्या भूमिकेवर ठाम आहे, असा इशारा पटोले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दिला.
हे ही वाचा :
पहा व्हिडिओ : "ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…"