जळगाव; नरेंद्र पाटील : जामनेर (जि. जळगाव) तालुक्यातील गोडखेड येथे चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच पतीचा दोरीने गळा आवळला. बाबाला आईनं कसं ठार मारलं?. ही आखो देखी घटना ७ वर्षाच्या मुलाने पोलिसांसमोर कथन केली. यातून या हत्या प्रकरणाचा उलघडा झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
अधिक वाचा :
गोडखेल येथे पती हा पत्नीवर नेहमी चारित्र्यावरुन संशय घेत होता. या कारणावरून आरोपी पत्नीने पती दिलीप विश्वनाथ सोनवणे (वय 35, रा. गोंधळ खेड) याचा काटा काढला. तिने दोरीच्या साह्याने त्याचा गळा आवळला.
यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र घटनास्थळी व परिस्थिती पाहता काही तरी वेगळे झाल्याचा संशय आला. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. त्या मुलाला विश्वासात घेताच खुनाचा उलघडा झाला. असे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी सांगितले.
अधिक वाचा :
गोदखेड येथील मयत दिलीप सोनवणे व त्यांच्या पत्नी आरोपी संगिता सोनवणे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.
हे दोघे एकत्र जात असताना दिलीप पत्नीवर संशय घ्यायचा. यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. या भांडणाचा उद्रेक झाला आणि 6 तारखेच्या रात्री दोघांमध्ये मुलासमोर भांडण झाले.
पती दारूच्या नशेत होता. तो घरात झोपेत असताना आरोपी पत्नी संगिताने मुलासमोर पती दिलीपचा दोरीने गळा आवळला. आणि त्याची हत्या केली.
ही सर्व घटना लहान मुलासमोर घडली. नेमके काय घडले याची आखो देखा हाल माहिती 7 वर्षाच्या मुलाने पोलिसांना सांगितली.
त्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेबाबत मयताची बहीण कल्पना युवराज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
पुढील तपास डीवायएसपी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.
याबाबत पोलिस निरीक्षक इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच मी व माझे सहकारी त्या ठिकाणी पोहोचलो. मयत दिलीप सोनवणे यांची बॉडी बघताच शंका आली.
इतक्या वर्षाच्या अनुभवातून परिस्थिती ही वेगळीच असल्याचे लक्षात आले. त्यानुसार चौकशी सुरू झाली. यावेळी घरातील मंडळींची चौकशी करण्यात आली. त्यावेळेस दिलीप सोनवणे यांच्या मुलाने रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला.
त्यावरुन संगिताला अटक करण्यात आली. सध्या ती एमसीआरमध्ये आहे.
हे ही वाचा :