मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार राष्ट्रपती होणार का, यावर नबाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार राष्ट्रपती होणार, या वृत्तांमध्ये तथ्य नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी सांगितले.
कालपासून माध्यमातून पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
अधिक वाचा :
त्याबाबत आज नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही.पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही.
तसेच इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा :
दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून सुरु असलेल्या चर्चांवर स्पष्ट शब्दात खुलासा केला होता.
एका वृत्तवाहिनीशी बाेलताना त्यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
अधिक वाचा :
मंगळवारी किशोर यांनी राजधानी दिल्लीतील खासदार निवासस्थानी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर निवडणुकांवर नव्हे तर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची चर्चा सुरु झाली.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले की, या संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. या सर्व बातम्यांना बिनबुडाचे वर्णन करीत ते म्हणाले की, आता राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत नाही.
हे ही वाचा :
हे ही पाहा :
[visual_portfolio id="7246"]