सांगली : कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भितीने वाढदिवसादिवशीच केली आत्महत्या

कोरोना पॉझिटीव्ह अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली
कोरोना पॉझिटीव्ह अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली
Published on
Updated on

इटकरे (सांगली) : पुढारी वृत्तसेवा : कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भितीने निखिल लक्ष्मण भानुसे (वय २८) य‍ा तरुण अभियंत्याने वाढदिवसादिवशीच गळफास घेवून आत्महत्या केली. सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह प्रमाणात वाढ होत आहे.

ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. तीनच महिन्यापुर्वी त्याचा विवाह झाला होता.

अधिक वाचा :

निखिल हा सिव्हिल इंजिनियर होता. चारच दिवसांपुर्वी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

अधिक वाचा : 

अहवाल पॉझिटीव्ह आल्यापासून तो अस्वस्थ होता. त्याच नैराश्यातून त्याने रात्री उशीरा घरासमोरील जनावारांच्या शेडमध्ये गळफास लावून घेतला, असे नातेवाईकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

अधिक वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news