रायगड : ट्रेडिंग मार्केटमध्ये नफ्याचे आमिष; व्यावसायिकाला ७४ लाखांचा गंडा…!

रायगड : ट्रेडिंग मार्केटमध्ये नफ्याचे आमिष; व्यावसायिकाला ७४ लाखांचा गंडा…!

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : ट्रेडिंग मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून नवी मुंबईमधील एका व्यावसायिकाला तब्बल ७४ लाख ५० हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी  नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रबोध कुमार रामकृष्णपील्ले (वय ५४, रा. कोपर खैरणे नवी मुबई) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

प्रबोध कुमार यांचा लॉजिस्टिक्स चा व्यवसाय आहे. प्रबोध कुमार यांना जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या मोबाईल वरील व्हॉट्सअप नंबरवर एक ग्रुप दिसून आला. या ग्रुपमध्ये आयपीओ, ब्लॉकट्रेडिंग याबाबत मॅसेज दिसून आला. या ग्रुपमधील सदस्यांना ट्रेडिंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नफा मिळाल्याचे त्यांना दिसून आले. या दरम्यान ग्रुपमधील मीरा नावाच्या महिलेने प्रबोध कुमार यांना ट्रेंड केल्यानंतर चांगला नफा मिळेल, असे सांगितले. हे ऐकून प्रबोध कुमार यांनी या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार त्यांनी या भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे इन्स्टिट्यूशनल अकाऊंट तयार केले. व या भामट्यांच्या वेगवेगळ्या खात्यावर ७४ लाख ५० हजार इतकी रक्कम पाठवली. ही रक्कम पाठवल्यानंतर मोठा नफा मिळेल, आम्ही तुम्हाला माहिती देऊ, असे भामट्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा भामट्यांनी प्रबोध कुमार यांना संपर्क करून एक लिंक पाठवली आणि त्या लिंकमध्ये रामकृष्णपिल्ले यांनी गुंतवलेल्या रक्कमेची माहिती दिसली. तसेच त्या गुंतवणुकीवर झालेला नफा त्या लीकवर दिसून आला. हा नफा जवळपास ४ करोड ५४ लाख एवढा होता. हा नफा पाहून ही रक्कम काढण्याची विनंती केली. मात्र ही रक्कम काढण्यासाठी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, अशी माहिती या भामट्यांनी दिली. माझ्याकडे एवढी रक्कम नाही,  माझ्या नफ्यातील रक्कम कट करून घ्यावी, अशी विनंती प्रबोध कुमार यांनी केली असता ते शक्य नाही, तुम्हाला रक्कम भरावी लागेल, असे त्यांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच प्रबोध कुमार यांनी याबाबत सायबर क्राईमला तक्रार दाखल केली.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news