कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्यातच तिसर्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक आज (दि. १५) कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापूरचा संसर्ग दरही राज्यात सर्वाधिक आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळेच पाहणीसाठी येणारे केंद्रीय पथक काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी हे पथक चर्चा करणार आहे.
अधिक वाचा :
केंद्रीय पथकाने कोल्हापूरच्या वाढत्या संसर्गाची आणि मृत्यूची दखल घेतली आहे.यामुळे त्याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी बुधवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका व आरोग्य विभागात याची तयारी केली होती.
केंद्रीय पथकाने सकाळी ११ वाजता सर्व संबंधितांना चर्चेसाठी पाचारण केले आहे.
या अधिकार्यांना घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण, काँटॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयु बेडची स्थिती, व्हेंटिलेटर याची माहिती पथकाला द्यावी लागणार आहे.
अधिक वाचा :
संभाव्य तिसर्या लाटेसाठी काय तयारी केली आहे, केंद्र सरकारकडून कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे. याची माहितीही यावेळी घेतली जाणार आहे.
बैठकीनंतर दुपारी हे केंद्रीय पथक सीपीआर हॉस्पिटलला भेट देणार आहे. तेथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी करणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या माहितीच्या आधारे काढण्यात आलेल्या निष्कर्षांची माहितीही हे पथक घेणार आहे.
सीपीआरमधील पाहणीनंतर हे पथक शहरातील काही लसीकरण केंद्रांना भेट देणार आहे.
अधिक वाचा :
त्याचबरोबर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय आणि काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना ते भेट देणार आहेत.
विशेषत: ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक होता त्याच प्रमाणे सर्वाधिक मृत्यू दर असलेल्या ठिकाणी पथक भेट देणार आहे.
याशिवाय कोणत्याही ठिकाणी हे पथक अचानक भेट देऊ शकते.
हे ही वाचा :