श्रीरामपूर : सर्वसामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य : शालिनीताई विखे | पुढारी

श्रीरामपूर : सर्वसामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य : शालिनीताई विखे

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य गरीब माणसापर्यंत पोहचल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम सर्वसामान्यांचा विचार केला. तोच विचार पुढे न्यायचा आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.

उक्कलगाव येथे सेवा संस्थेच्या आनंदाचा शिधा शालिनीताई विखे यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, पं. स. माजी माजी सभापती संगिता शिदे, वृषाली नाईक, बेबी थोरात, नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ, मंडलाधिकारी बी. के. मंडलिक, तलाठी इम्रानखान इमानदार, प्रशासक दीपक मेहेरे, ग्रामविकास अधिकारी रमेश निबे उपस्थित होते.
विखे म्हणाल्या, आनंदाचा शिधा वाटपाचे काम सोसायटीने हाती घेतले. हे काम कौतुकास्पद आहे.

गुढी पाडवा ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधाचे वाटप करून उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनातून दोनवेळा जेवनामुळे उर्जा मिळते. राज्य सरकारने कामगारांना वस्तूंच्या किटचे वाटप केले. वयोश्री योजनेतून 60 वर्षांपुढील व्यक्तीस 25 वस्तू लागू केल्या. यासाठी केंद्राने 100 कोटी मंजूर केले. खा. डॉ. सुजय विखे यांनी नगर जिल्ह्यास 50 कोटी जास्त निधी वयोश्रीतून आणला. देवीदास देसाई म्हणाले, 110 धान्य दुकानांमध्ये 37 हजार आनंदाचा शिधाचे किट पोहचले.

पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले!
शिर्डीत श्रीसाईबाबांच्या लाखो भाविक दर्शनास येतात. बाबांना अर्पण केलेले फुले, हार फेकून दिले जायचे. जनसेवा फेडेरेशनने ते उपयोगात आणून 10 टक्के कराराने विकत घेतले. त्यापासून अगरबत्या, अष्टगंध, उदी, मध, दोरापासून 1 लाख राख्यांचा उपक्रम राबवून त्या सीमेवर सैनिकांना पाठविल्या. यातून 40 हजार महिलांना रोजगार मिळाला. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टाकाऊपासून टिकाऊचे स्वप्न पूर्णत्वास आणल्याचे शालिनीताई विखे म्हणाल्या.

Back to top button