पिंपरी : एक लाखाची लाच घेणारा पालिका लिपिक निलंबित | पुढारी

पिंपरी : एक लाखाची लाच घेणारा पालिका लिपिक निलंबित

पिंपरी : कामाच्या वर्कऑर्डरची फाईल तयार करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारणार्‍या पाणीपुरवठा विभागाचा अनुरेखक (लिपिक) दिलीप भावसिंग आडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.21) रंगेहात पकडले. त्या लिपिकाला महापालिकेने सेवानिलंबित करून त्याची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. पाणीपुरवठा विभागाची देखभाल व दुरुस्तीची कामे करणार्‍या ठेकेदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना आडे (51) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर ापालिका सामान्य प्रशासन विभागाने लाच घेणार्‍या संबंधित लिपिकाविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली. आडे याला पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले असून, त्याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.24) दिले आहेत.

Back to top button