पिंपरी : गृहिणींसाठी आता पदार्थांना फोडणी देणे झाले स्वस्त | पुढारी

पिंपरी : गृहिणींसाठी आता पदार्थांना फोडणी देणे झाले स्वस्त

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महागाईचा तडका वाढत असताना गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या 15 लिटर आणि किलोच्या डब्यामागे 650 ते 900 रुपयांची घसरण झाली आहे. तर, प्रति किलोमागे 40 ते 60 रुपये दर कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच, गृहिणींची फोडणी स्वस्त झाली आहे.

घाऊक आणि किरकोळ बाजारात सध्या खाद्यतेलाची आवकजास्त आहे. त्या तुलनेत मागणी मात्र कमी आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. जोपर्यंत जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत राहील, तोपर्यंत खाद्यतेलाचे दर वाढणार नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील खाद्यतेलाचा पुरवठा सध्या सुरळीत आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेसह किरकोळ बाजारपेठेत खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. पर्यायाने, वाढत्या महागाईत खाद्यतेलाच्या दराने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

खाद्यतेलाचे दर कमी होण्याची कारणे
गतवर्षी खाद्यतेलाची आयात होत नव्हती.
सध्या ही आयात सुरळीत सुरु.
भारतातील तेलबियांच्या उत्पादनात वाढ.
काही देशांमध्ये पाम तेलाचे उत्पादन वाढले.
भारत सोडून इतर देशात मागणीचा दर कमी.

घाऊक बाजारातील खाद्यतेलाचे दर (15 लिटर/किलो)
तेलाचे प्रकार 9 मार्च 2022 ते मार्च 2023
सूर्यफुल (15 लिटर) 2850 1940
सोयाबीन (15 लिटर) 2320 1680
पामतेल (15 किलो) 2500 1650
मोहरी तेल (15 किलो) 2550 2000
वनस्पती तुप (15 किलो) 2450 1500

गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या दरात 15 किलो किंवा 15 लिटरच्या डब्यामागे 650 ते 900 रुपयांची घसरण झाली आहे. तर, प्रति किलोमागे सरासरी 40 ते 60 रुपये इतके़ दर कमी झाले आहे. मागणीच्या तुलनेत सध्या खाद्यतेलाचा जास्त पुरवठा होत आहे. तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गतवर्षी रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जाणवत होता. खाद्यतेलाची आयात सुरळित नव्हती.

                                    – श्याम मेघराजानी, अध्यक्ष,
                          पिंपरी किराणा अ‍ॅण्ड ड्रायफ्रुट असोसिएशन.

Back to top button