सातारा : शिरवळमध्ये एकाचा गोळ्या घालून खून
![हॉटेलांध्ये मेलेल्या कोंबड्यांची विक्री](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2021/10/23084219/crime-search-1.jpg)
नायगाव (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
शिरवळ (ता. खंडाळा) येथे काल (रविवार) रात्री एकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे समजू शकलेले नाही. संजय सुभाष पाटोळे ( वय 36, रा. बिबवे वाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरवळ गावातील निरा नदी काठी लेक पॅलेस अपार्टमेंट आहे. या ठिकाणी संजय पाटोळे यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
खून झालेली व्यक्ती नेमकी कोण आहे? त्यांचा कोणी आणि कशासाठी खून केला? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. दरम्यान, पोलिसांचे एक पथक पुणे येथे रात्रीच गेले असून, या घटनेचा उलगडा कधी होणार? याकडे लक्ष लागले आहे.