IPL 2023 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला आंद्रे रसेल मुकणार? | पुढारी

IPL 2023 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला आंद्रे रसेल मुकणार?

मुंबई : रविवारी होणार्‍या (IPL 2023) मुंबईविरुद्धच्या सामन्यात केकेआरचा दमदार खेळाडू आंद्रे रसेलचे खेळणे नक्की नसल्याचे बोलले जात आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान आंद्रे रसेलच्या पायात काही समस्या निर्माण झाली होती, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले होते. केकेआरचा स्टार खेळाडू रसेल आयपीएलच्या गेल्या काही हंगामापासून फिटनेसच्या समस्येशी झुंजत आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजीतही अडचणी येत आहेत.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रसेलने केवळ दोनच षटके टाकली, तेव्हा त्याच्या पायात दुखू लागल्याने त्याने मैदान सोडले. आयपीएल 2023 च्या हंगामात केकेआरसाठी रसेलने तीन सामन्यांमध्ये गोलंदाजी केली नाही; पण केकेआरचा कर्णधार नितीश राणाने त्याला हैदराबाद विरुद्ध गोलंदाजीसाठी बोलावले. या अष्टपैलू खेळाडूने पहिल्याच षटकांत दोन विकेटस् घेतल्या. (IPL 2023)

रसेलला आयपीएलमध्ये मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जाते. त्याने अनेक प्रसंगी आपल्या शानदार फलंदाजीने कोलकात्यासाठी सामने जिंकले आहेत. आंद्रे रसेल फलंदाजीत काही मोठी कामगिरी करू शकला नसला तरी गोलंदाजीत त्याने आपली दमदार कामगिरी दाखवून दिली; पण त्यानंतर त्याला पायाच्या दुखापतीमुळे सामना सुरू असतानाच संघाबाहेर जावे लागले. याचा फटका आता केकेआरला बसणार का, हे पुढच्या सामन्यात कळणार आहे.

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?