बेट भागात चोर्‍यांचा सपाटा; नागरिकांमध्ये घबराट | पुढारी

बेट भागात चोर्‍यांचा सपाटा; नागरिकांमध्ये घबराट

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाट्यावरील योगेश खामकर यांचे मेडिकलचे दुकान रविवारी(दि. 26) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडत रोख रक्कम पळविली. तसेच मलठण येथील भैरवनाथ कृषी केंद्र, श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र यांचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास केली. प्रसाद वाव्हळ यांची घरासमोरून दुचाकी गाडी चोरुन नेली. वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकुळ सुरू आहे. शेतकरी, नागरिक चोरीच्या घटनांमुळे धास्तावले आहेत.

चोरट्यांचा शोध घेण्यात व चोरीच्या घटना रोखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. शेतकर्‍यांच्या विद्युत मोटार, दुचाकी, कृषी केंद्र व मेडिकल यांचे शटर उचकटून यामधील रोख रक्कम लुटणे आदी प्रकार कवठे येमाई, आमदाबाद, जांबूत, टाकळी हाजी, मलठण या भागात सातत्याने घडत आहेत. शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी या भागात ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांना पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. पोलिस पाटील यांनी ग्रामसुरक्षा दलाच्या तुकड्या बनविल्या आहेत. परंतु, पोलिस आणि ग्रामसुरक्षा दलाने गस्त घालूनही चोरीच्या घटना घडत आहेत.

हेही वाचा

माऊलींचा पालखी सोहळा उद्या सातारा जिल्ह्यात

मिरज : अनेक सावकार बँक, पतसंस्थांत पदाधिकारी

सांगली : जिल्ह्यातील 105 गुंड तडीपार!

Back to top button