कळंबच्या यात्रेत 350 बैलगाडे धावले..! | पुढारी

कळंबच्या यात्रेत 350 बैलगाडे धावले..!

मंचर : पुढारी वृत्तसेवा : कळंब येथील ग्रामदैवत श्रीभैरवनाथ महाराजांची यात्रा सोमवार, दि. 6 आणि मंगळवार, दि. 7 मे अशी दोन दिवसांत मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत एकूण 350 बैलगाडे धावले, अशी माहिती यात्रा समितीच्या वतीने देण्यात आली. घाटाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, उपसरपंच संतोष भालेराव, भाजपचे नेते जयसिंगराव एरंडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, कमलेश वर्पे, बैलगाडा मालक शशिकांत भालेराव, नीलेश येवले, जयसिंग एरंडे, राहुल भालेराव, माजी उपसरपंच प्रताप भालेराव, दत्ता वर्पे आदींच्या उपस्थितीत झाले.

सोमवारी फळीफोड राजेंद्र पांडुरंग निघोट, घाटाचा राजा सीताराम नागोजी थोरात, अनुप मुळे आणि गणेश खिल्लारी यांची जुगलबंदी झाली. दुसरा दिवस फळीफोड दिवंगत मारुती रामभाऊ एरंडे, घाटाचा राजा तुषार डावखर, साहिल कांचन मुर्हे आणि हरिदास चक्कर यांची जुगलबंदी झाली. फायनल पहिला दिवस एक नंबर फायनल आणि दुचाकीचे मानकरी सीताराम नागोजी थोरात, अनुप मुळे आणि गणेश खिल्लारी जुगलबंदी, दोन नंबर चैतन्य विनायक पडवळ आणि गणेश देवकर जुगलबंदी, दोन नंबर फायनल आणि दुचाकी मानकरी भिकाजी दादा तुकाराम चव्हाण, ओमसाई बैलगाडा संघटना आणि श्रीराज सुनील पाचपुते यांच्यात जुगलबंदी झाली.

मंगळवारी फायनलमध्ये दुसर्‍या दिवशी एक नंबर फायनल आणि दुचाकी मानकरी तुषार डावखर आणि साहिल कांचन मुर्हे जुगलबंदी, गोविंद ज्ञानेश्वर खिल्लारी. दोन नंबर फायनल आणि दुचाकी मानकरी दिवंगत बंडूशेठ पडवळ आणि तानाजी शिंदे जुगलबंदी, दोन नंबर संतोष कचरदास बारवे चास तसेच यांच्यासह नंबरमध्ये आलेल्या सर्व बैलगाडा मालकांना बक्षीस वितरण मंचर बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी भालेराव, भीमाशंकर कारखाना माजी संचालक यशवंत कानडे, जयसिंग भालेराव, माजी उपसरपंच बाळासाहेब भालेराव, अनिल भालेराव, किसन भालेराव, प्रताप भालेराव, ग्रामपंचायत सदस्य सुशील भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. शर्यतीचे समालोचन साहेबराव आढळराव, लक्ष्मण बांगर यांनी केले. घड्याळाचे काम शशिकांत भालेराव, सुशील भालेराव आणि घड्याळ मास्टर नितीन थिगळे यांनी पाहिले. तसेच निशाण बजावण्याचे काम पोपट पानसरे यांनी केले. लिखाणाचे कामकाज संदीप भालेराव, उदय भालेराव, सुजित भालेराव यांनी पाहिले. बैलगाडा लाईनचे काम एम. टी. ग्रुप, कळंब यांनी केले.

हेही वाचा

Back to top button