पिंपरी: विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज | पुढारी

पिंपरी: विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाकाळात तब्बल दोन वर्षानंतर 15 जून रोजी शहरातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांतील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग सज्ज झाला आहे. यंदा 13 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, 13 जूनला फक्त शिक्षकांनाच शाळेत येवून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी व सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना याबाबत माहिती देण्यासाठी बोलावले होते. शाळा सुरू होणार म्हणून शाळांची साफसफाई आणि सॅनिटायजेशन सुरू आहे. तर काही शाळांचे काम पूर्ण झाले आहे.

शाळा यंदा विद्यार्थ्यांचा जोरदार प्रवेशोत्सव करणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये विविध पातळीवर नियोजन सुरू आहे. पहिल्याच दिवशी गुलाबपुष्प, औक्षण, फुलांची उधळण, रांगोळी आणि ढोल – ताशांचा गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. विद्यार्थी देखील शाळेत येण्यास उत्सूक आहेत. विद्यार्थी स्वागतासाठी शाळा सजविण्यात येत आहे. शाळा परिसरात रंगीत पताका लावण्यात येत आहे. वर्गाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायजर अनिवार्य केले आहे.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आता अकरा हजारांवर; पाचशेपेक्षा जास्त रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार

तसेच मध्यान्ह भोजनाच्यावेळी देखील विद्यार्थी एकत्र येवून संसर्ग होवू नये यासाठी मुलांची व मुलींची वेगळी व्यवस्था किंवा गट पाडून जेवायला बसविण्याचे नियोजन आहे. सोशल डिस्टिन्सिंग पाळण्यासाठी रांगेत मुलांमुलींना ये -जा करण्याची सूचना देण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्याकडून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन घेण्यात येणार आहे.

शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सर्व सूचना देण्यात येतील. स्वच्छतागृहात पाणी आणि हात धुण्यासाठी वॉश बेसिनची आणि साबण यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची सर्व मजल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वत: बरोबर पाण्याची बाटली ठेवायची आहे.

-प्राचार्य विक्रम काळे, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज

नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शिक्षकांच्या बैठका आणि पालक सभा घेत आहोत. पाठ्यपुस्तक वाटपांचे नियोजन शाळांमध्ये सुरू आहे. वर्ग खोल्याची साफसफाई झाली आहे.

प्राचार्य सुनील लाडके, श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आकुर्डी

हेही वाचा

बेळगाव : मराठी फलकावरून कन्नडिगांमध्ये संताप

समाजातील सर्वजण एकोप्याने राहतोय; चंदूर धनगर समाजाचे स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदी-उद्धव ठाकरे आज एका व्यासपीठावर

Back to top button