पुणे : विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान | पुढारी

पुणे : विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा

बुट्टेवाडी (ता. खेड) येथे पडक्या विहिरीत पडलेल्या हरिणाला राजगुरूनगर वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या तासाभरात बाहेर काढून जीवदान दिले.

बुट्टेवाडी येथील तळेमाळ शिवारात राजेंद्र चिंतामण तळेकर यांच्या शेतातील विहिरीत गुरुवारी (दि. ३) सकाळी १२ वाजता हरीण पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दोर घेऊन उपस्थित झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या नर हरिणाला बाहेर काढण्यात आले.

Obc Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत ओबीसी आरक्षणाशिवायच

जमिनीवर आल्याबरोबर सुमारे दोन वर्षे वयाच्या हरिणाने धुम ठोकली. पांगरी-बुट्टेवाडी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गाढवे, नामदेव तळेकर, निवृत्ती तळेकर, सुमित तळेकर, राहुल तळेकर, तुषार तळेकर, नवनाथ तळेकर यांनी विहिरीत पडलेल्या हरिणाला बाहेर काढून जीवदान देण्यात सहभाग घेतला.

हे वाचले का?

विधिमंडळ अर्थसंकल्‍पीय अधिवेशन : जोरदार घोषणबाजीमुळे राज्‍यपालांनी अभिभाषण थांबवले

Russian invasion of Ukraine : रशियन सैन्यानं खेरसन शहर घेतलं ताब्यात, युक्रेनमधील ५ शहरे उद्ध्वस्त

COVID death : देशातील कोरोना मृतांची संख्या संशयास्पद : पी. चिदंबरम यांचा आरोप

Back to top button