COVID death : देशातील कोरोना मृतांची संख्या संशयास्पद : पी. चिदंबरम यांचा आरोप | पुढारी

COVID death : देशातील कोरोना मृतांची संख्या संशयास्पद : पी. चिदंबरम यांचा आरोप

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा
देशातील कोरोना मृतांची संख्या ( COVID death ) संशयास्पद असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सोशल मीडियाद्वारे केला. एका नामांकित जागतिक आरोग्य पत्रिकेने दिलेल्या आकडेवारीत आणि केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीत खूप तफावत असून सरकारची आकडेवारी अविश्वसनीय असल्याचे चिदम्बरम यांनी म्हटले आहे.

COVID death : गावांमध्‍ये झालेल्या मृत्यूची नोंदच नाही

आरोग्य पत्रिकेने १ जून २०२० ते १ जुलै २०२१ या कालावधीत भारतात कोरोनामुळे ३० लाख मृत्यूमुखी पडले असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे याच कालावधीतील सरकारची आकडेवारी चार लाख आहे. पत्रिकेने सांगितल्यानुसार, ३० लाखांपैकी तब्बल २७ लाख मृत्यू हे केवळ एप्रिल, मे आणि जून २०२१ या तीन महिन्यांत झालेले आहेत. देशात ६ लाख ३८ हजार ३६५ गावे असून असंख्य गावांत झालेल्या मृत्यूची नोंदच करण्यात आलेली नाही. गावात मृत्‍यू झालेल्‍यांची सरासरी टक्केवारी एक टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि हेही धक्कादायक आहे, असेही चिदंबरम यांनी नमूद केले. आरोग्य मंत्रालयाकडील ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत कोरोनाने ५ लाख १४ हजार ३८८ लोकांचा बळी घेतलेला आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button