गिरीश महाजन म्हणाले, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार यावे, ही श्रींची इच्छा | पुढारी

गिरीश महाजन म्हणाले, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार यावे, ही श्रींची इच्छा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पुन्हा भाजपचे सरकार यावे. ही श्रींची इच्छा आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात कोणीच सुखी नाही. असा टोला आमदार गिरीश महाजन यांनी आघाडी सरकारला लगावला आहे. गणरायाच्या आगमनाचे औचित्य साधत आ. गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला कोपरखळी मारली आहे.

गणेश उत्‍सव २०२१ : श्री रेणुकेची आरती

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी अखेर रद्द

आज जामनेर येथील गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गणरायाकडे मागणी केली नाही. मात्र श्रींचीचं इच्छा आहे की राज्यात भाजपचे सरकार यावे. सर्वच घटकांना म्हणजे माध्यमिक, गरीब, श्रीमंत या सर्वांना अपेक्षा आहे.

Gold Rates : सोन्याचे दर अचानक का पडले?; WGCनं सांगितलं कारण!

अजय देवगणकडून ‘पॅनोरमा म्युझिक’चा श्रीगणेशा

या आघाडी सरकारच्या दोन वर्षांची कारकीर्द बघितली असता या राज्यात कोणीच सुखी नाही. मी फक्त गणरायाला कोरोनाबाबत व नैसर्गिक आपत्तीबाबत साकडे घातले आहे. सरकार यावे ही गणरायाची इच्छा आहे. ती ते पूर्ण करतील असे महाजन यावेळी म्हणाले.

Ganesh Chaturthi 2021 : सेलिब्रिटींचे बाप्पासोबतचे फोटो

परीस : देवमाणूस फेम या अभिनेत्रीचं गाणं ‘गुढ’ भेटीला

विघ्नहर्ता संकटे दूर करतील. नैसर्गिक आपत्तीपासून वाचवतील. त्यासाठी आपण त्यांच्याकडे प्रार्थना केली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पाहणीसाठी होते. तेव्हा पुन्हा एकत्र पाहणी केली. या प्रश्नावर महाजन म्हणाले की, आम्ही सर्व जवळच आहोत. नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी गुलाबराव जामनेरात येतात. त्यामुळे त्यांना म्हटले की, तुम्ही घरी या. चाळीसगावला आहे. आम्ही सोबतच पाहणी केली.

नैसर्गिक आपत्ती काळात कोणीही राजकारण आणू नये. दुजाभाव न ठेवता एकत्र आले पाहिजे. ज्यामुळे जनतेला अधिकाधिक मदत होईल, असेही महाजन म्हणाले.

BRICS : विकसनशील देशांसाठी ‘ब्रिक्स व्यासपीठ’ महत्वाचे : पंतप्रधान मोदी

M S Dhoni : महेंद्रसिंग धोनी याच्या नियुक्तीला आक्षेप

सहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला केले जेरबंद 

पाहा व्हिडिओ – बाप्पाचे प्रिय उकडीचे मोदक | Modak Recipe

 

 

Back to top button