अमरावती : दारूच्या नशेत चुलत भावाचा चाकूने भोसकून खून; आरोपी फरार | पुढारी

अमरावती : दारूच्या नशेत चुलत भावाचा चाकूने भोसकून खून; आरोपी फरार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकारीपुरा परिसरात एका तरूणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.२) रात्री उघडकीस आली. हा खून दारूचा नशेत असलेल्या त्याच्या चुलत भावानेच केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर तो फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित सुभाष जोशी (२६) हा दारूचा नशेत खडकारीपुरा येथील हर्षलता माता मंदिर परिसरात आला. त्या ठिकाणी त्याचा चुलत भाऊ प्रतीक प्रविण जोशी (२५) उभा होता. या ठिकाणी दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. दरम्यान आरोपी सुमितने प्रतीकवर चाकूने सपासप वार केले आणि तेथून तो फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतिकला स्थानिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने सुमितचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच खोलापूरी गेट पोलिसांसह डीसीपी कल्पना बारवकर, एसीपी शिवाजी बचाटे, एसीपी भवर, क्राइम ब्रांचचे पीआय गोरखनाथ जाधव घटनास्थळी पोहोचले. आरोपी चुलत भावाने भावाचाच खून का केला? याचे कारण अद्याप समजले नाही. पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button