मँचेस्टर; पुढारी ऑनलाईन : टीम इंडियांच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी अखेर रद्द करण्यात आली आहे.
भारतीय संघातील मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील तीन सदस्य भारत अरुण, नितीन पटेल आणि आर. श्रीधर हे विलगीकरणात गेले होते.
भारतीय क्रिकेट संघाचे ज्युनिअर फिजियो योगेश परमार यांचीही कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्याने शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी गुरुवारी आपले सराव सत्र रद्द करावे लागले. बीसीसीआय अधिकाऱ्यानेच ही माहिती दिली होती. त्यामुळे शेवटच्या कसोटीबाबत साशंकता निर्माण झाली होती.
परमार यांची चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर संघाकडे एकही फिजिओ उपलब्ध नव्हता. मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रीय ओवल कसोटी दरम्यान संक्रमित झाल्यानंतर मुख्य फिजियो नितिन पटेल विलगीकरणात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संघाने सामना खेळण्यास इच्छूक नसल्याचे कळवले होते.
भारताने ओव्हलमध्ये सामना जिंकला तेव्हा केवळ फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड संघासोबत होते. खेळाडू आणि सहयोगी स्टाफच्या सर्व सदस्यांचे लसीकरण झाले आहे. भारत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा आघाडीवर होता.
हे ही वाचलं का?