परीस : देवमाणूस फेम या अभिनेत्रीचं गाणं ‘गुढ’ भेटीला

परीस : देवमाणूस फेम या अभिनेत्रीचं गाणं ‘गुढ’ भेटीला
Published on: 
Updated on: 

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ग्रामीण कथेवर आधारित रहस्यमय परीस नावाची वेबसीरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रदर्शित झाली आहे. तिला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परीस या वेबसीरीज मधील 'गूढ' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे बोल आणि संगीत निरंजन पेडगावकर यांचे असून जयदिप वैद्य यांनी हे गाणे गायले आहे.

ग्रामीण कथा असलेल्या सीरीजमधील या गाण्याचे बोल आहेत. गाणे श्रवणीय असून यातील ग्रामीण लहेजा आणि गावरान शब्द विशेष लक्षवेधी आहेत.

लोखंडास परीसाचा स्पर्श झाल्यास त्याचे सोने होते. ही गोष्ट गावातील काही लोकांना समजते आणि ते परीसाच्या शोधात निघतात. या शोधादरम्यान एका तरुण – तरुणीचे एकमेकांवर प्रेम जडते. त्यांच्या या प्रेमाचा प्रवास आपल्याला 'गूढ' या प्रेमगीतामधून पाहायला मिळतो. त्यांना तो परीस सापडतो का? तो मिळवण्यासाठी ते कोणत्या थराला जातात? त्या जोडप्याचे पुढे काय होते ? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रेक्षकांना 'परीस' पाहावी लागेल.

अक्षय बर्दापूरकर म्हणाले-

'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात.- अंधश्रद्धेवर आधारित या सीरीजमधील 'गूढ' हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे.

अतिशय सुमधूर असे हे प्रेमगीत आहे. या गाण्याचे बोल ग्रामीण असल्यामुळे हे एक वेगळ्या धाटणीचे गाणे बनले आहे. या गाण्याचा एक वेगळाच बाज असून जयदीप वैद्य याने अतिशय सुंदर पद्धतीने ते गायले आहे.

आगामी काळात अनेक नवनवीन वेबसीरीज व वेबफिल्म्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करण्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल. याची खात्री आहे.

पाहा व्हिडिओ- Gudh Song [Now Streaming] | Parees | Planet Marathi Originals | Niranjan Pedgaonkar | Jaydeep Vaidya

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news