कोल्हापूर : सुशिला देवी आबीटकर फाउंडेशनकडून आभा हेल्थ कार्डचे वाटप | पुढारी

कोल्हापूर : सुशिला देवी आबीटकर फाउंडेशनकडून आभा हेल्थ कार्डचे वाटप

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याकरीता सुशिला देवी आबीटकर हेल्थ फाउंडेशन सक्रिय असुन त्याचा एक भाग म्हणून आभा हेल्थ कार्डचे वाटप सुरू आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजयालक्ष्मी प्रकाश आबीटकर यांनी केले.

वाघापूर (ता. भुदरगड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सुशिला देवी आनंदराव आबीटकर हेल्थ फाउंडेशन यांच्या वतीने आयुष्यमान भारत कार्डच्या वाटप प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रा.प.सदस्या जयश्री बा. दाभोळे होत्या. यावेळी आबीटकर म्हणाल्या की, संपूर्ण मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ५० हजार आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात येणार असुन याद्वारे आरोग्याच्या सेवा सुविधा चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. यावेळी कृष्णात जठार यांनी घरोघरी जावून कार्ड काढण्यासाठी लोकांना आम्ही माहिती देत असुन लोकांनीही याला सहकार्य करावे असे सांगितले.

कार्यक्रमास कमल जठार, अवधुत परुळेकर, विजय सारंग, बळीराम जठार, ग्रामपंचायत सदस्य युवराज आरडे, सुनिल जठार, अरविंद जठार, समाधान दाभोळे, बी.एस जठार, हरी जठार, लता जठार आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button