तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जबाबदारी कोल्हापूरकरांवर : PM मोदी | पुढारी

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जबाबदारी कोल्हापूरकरांवर : PM मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस विकासात एनडीएची बरोबरी करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी तुष्टीकरण कऱण्यास सुरूवात केली असून त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा देशविरोधी अजेंडा आहे, असा आरोप करत यंदाची लोकसभा विकसित भारतासाठी आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जबाबदारी कोल्हापूरकरांवर आहे, असे आवाहन आज ( दि.२७) पंतप्रधान मोदी यांनी केले.

तपोवन मैदानावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. यावेळी करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी त्रिवार वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. मी काशीचा खासदार करवीर काशीला आल्याचे माझे भाग्य आहे. जगात भारी आम्ही कोल्हापुरी, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, कोल्हापुरला महाराष्ट्राचे फुटबॉल हब असे म्हटले जाते. तरुणामध्ये फुटबॉल लोकप्रिय आहे. विरोधकांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाला सुरूवात केली आहे. काँग्रेसने ३७० कलम पुन्हा आणण्याची घोषणा केली आहे. परंतु, कुणाच्यात हिंमत आहे का ?, मोदींचे पाय मागे ओढण्याची, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

काँग्रेस सत्तेवर आल्यावर सीएए रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. अयोध्येतील राममंदिर उद्घाटनावरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. नकली शिवसेनेमुळे जिथे बाळासाहेब असतील, तिथे ते दुखी झाले असतील. नकली शिवसेना काँग्रेससोबत फिरत आहे. काँग्रेस आरक्षणासाठी कर्नाटक मॉडेल राबवित आहे. तिथल्या मुस्लिमांना ओबीसी करून टाकले आहे. काँग्रेसने नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे.

हेही वाचा 

Back to top button