कोल्हापूर : उत्पन्न बाजार समिती : संघर्ष टाळण्यासाठी नेते प्रयत्नशील | पुढारी

कोल्हापूर : उत्पन्न बाजार समिती : संघर्ष टाळण्यासाठी नेते प्रयत्नशील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीतील संघर्ष टाळण्यावर भर देणे, जागा वाटप या विषयांवर चर्चा झाली. यानंतर पुढील बैठक दोन दिवसांत घेण्याचे ठरविण्यात आले. मात्र, जागा वाटपाबाबत नेत्यांना चांगलीच ताणाताणी करावी लागणार आहे.

कोल्हापूर बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवार (दि. 20) पर्यंत अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्र आणि मतदारांच्या गाठीभेटीसाठी मिळणारे दिवस पाहता ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते; पण इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर आहे. यामुळे पॅनेल रचनेसाठी नेते मंडळींनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीला आ. हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, माजी आ. के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत खोत आदी उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित नेते मंडळींनी एकत्र येऊन कोल्हापूर बाजार समितीची निवडणूक लढवावी, अशी चर्चा या बैठकीत झाली. तसेच उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी अद्याप चार दिवस बाकी आहेत. तोपर्यंत याच विषयावर पुन्हा एक चर्चेची फेरी करून त्यात जागा वाटपाचा फॉर्मिला ठरविण्यावर नेत्यांनी मते व्यक्त केली. दरम्यान, या निवडणुकीबाबत खा. संजय मंडलिक यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे समजते.

अवैध उमेदवारी अर्जांचा आज निकाल

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या माजी संचालकांचा सोमवारी जिल्हा उपनिबंधक निकाल जाहीर करणार आहेत. या निकालाकडे समितीशी संबंधितांचे लक्ष लागून राहिले आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येणेबाकी असल्याने 11 माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यावर माजी संचालकांनी जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याची सुनावणी गेल्या बुधवारी झाली. यानंतर निकाल सोमवारी दिला जाईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी स्पष्ट केले होते. या निकालाकडे माजी संचालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?