आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर | पुढारी

आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी (दि. 8) जाहीर झाला. तुकोबा पालखी सोहळ्याचे 20 जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होईल, तर 21 जूनला आळंदी येथून माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर पायी वारी पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने वारकर्‍यांमधून आनंद व्यक्त होत आहे.

देहूरोड : उमेश ओव्हाळ

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोमवारी (दि. 20 जून) रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. त्यादिवशी पालखीचा मुक्काम देहूतच राहील, अशी माहिती देहू संस्थानच्या वतीने देण्यात आली. या वेळी नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे आणि विशाल महाराज मोरे उपस्थित होते.

देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम; सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांवर

मंगळवार (दि. 21 ) रोजी अनगडशाह वली दर्ग्याजवळ अभंग-आरती होऊन पालखी मार्गस्थ होईल. निगडी येथे पिंपरी-चिंचवडवासीयांकडून पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते. त्यानंतर सोहळा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. बुधवार (दि. 22) रोजी नाना पेठ येथे पालखी सोहळा थांबेल. गुरुवार (दि. 23) चा संपूर्ण दिवस पालखी नाना पेठ निवडुंगा विठ्ठल मंदिरात थांबेल. दरम्यान पालखी सोहळा पिंपरी, कासारवाडी, शिवाजीनगर येथे विश्रांती घेईल.

दिव्यांग मुलाला इंडिगो विमानात प्रवेश नाकारला, म्हणे मुलाचे वर्तन सामान्य नाही! (पहा व्हिडिओ)

शुक्रवार (दि. 24) रोजी पालखीचा मुक्काम लोणी काळभोर येथे राहील. भैरोबा नाला, हडपसर, मांजरी फार्म आदी ठिकाणी विश्रांती राहील. शनिवार (दि.25) रोजी पालखी यवत मुक्कामी जाईल. वाटेत कुंजीर फाटा, उरुळी कांचन आणि जावजी बुवाची वाडी अशी विश्रांती राहील. रविवार (दि. 26) रोजी पालखी वरवंड मुक्कामी असेल. वाटेत भांडगाव आणि चौफुला या ठिकाणी विश्रांती राहील.

मुंबईत २९ ठिकाणी एनआयएची छापेमारी; दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम फ्रूटला घेतलं ताब्यात

सोमवार (दि. 27) रोजी पालखीचा मुक्काम उंडवडी गवळ्याची इथे राहील. वाटेत भागवत वस्ती, पाटस, रोटी घाटात अभंग- आरती होईल. हिंगणी गाडा, वासुंदे, स्वराजवाडी या ठिकाणी विश्रांती होईल. मंगळवार (दि. 28) रोजी पालखी हवेली तालुका सोडून बारामती तालुक्यात जाईल. येथील शारदा विद्यालयाच्या प्रांगणात पालखी मुक्काम राहील. वाटेत उंडवडी पठार, बर्‍हाणपूर, मोरेवाडी व सराफ पेट्रोल पंप याठिकाणी विश्रांती होईल.

Market : सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर, सोने आणखी महागले!

शनिवारी इंदापूरला मुक्काम

बुधवार (दि. 29) रोजी पालखीचा मुक्काम सणसर येथे मारुती मंदिरात राहिल. वाटेत मोतीबाग, चिंबळी ग्रेप, लिमटेक, काटेवाडी आणि भवानीनगर साखर कारखाना या ठिकाणी विश्रांती होईल. काटेवाडी येथे धोतराच्या पायघड्या, मेंढ्यांचे रिंगण होईल.
गुरुवार (दि. 30) रोजी बेलवंडी येथे पालखीचे पहिले गोल रिंगण होणार आहे. पालखीचा मुक्काम आंथुर्णे येथे राहील. लासुर्णे आणि जंक्शन या ठिकाणी विश्रांती असेल. शुक्रवार (दि. 1) जुलै रोजी पालखी निमगाव केतकी येथे जाईल. केतकीच्या पानांनी पालखीचे स्वागत होईल. शनिवार (दि. 2) जुलै रोजी इंदापूर येथे पालखीचा मुक्काम होईल. या ठिकाणी तरंगवाडीचा कॅनल व गोकुळचा वाडा या ठिकाणी दुपारची विश्रांती होईल. इंदापूर येथे पालखीचे दुसरे गोल रिंगण होईल. रविवार (दि.3) रोजी संपूर्ण दिवस इंदापूर मध्ये मुक्काम राहील.
सोमवार (दि. 4) रोजी पालखीचा मुक्काम सराटी येथे असेल. वाटेत गोकुळीचा ओढा, विठ्ठलवाडी, वडापुरी, सुदवडी व बावडा या ठिकाणी विश्रांती घेईल.

priyanka chopra : प्रियांकाच्या लेकीचा पहिला फोटो आला समोर

मंगळवार (दि. 5) रोजी पालखीचा मुक्काम अकलूज येथे माने विद्यालयात होईल. येथे पालखीचे गोल रिंगण होईल. बुधवार (दि. 6) रोजी बोरगाव मुक्कामी पालखी राहील. सकाळी माळीनगर येथे उभे रिंगण होईल.वाटेत पायरीचापूल, कदम वाकवस्ती येथे विश्रांती होईल. गुरुवार (दि. 7) जुलै रोजी पालखी पिराची कुरोली येथील गायरानात मुक्कामी असेल. वाटेत माळखांबी, तोंडले-बोंडले आणि टप्पा ही विश्रांतीची ठिकाणे राहतील. शुक्रवार (दि. 8) रोजी पालखीचा मुक्काम वाखरी येथे असेल.

संजय राऊतांविरोधात किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार

बाजीराव विहीर येथे उभे रिंगण

पापळवस्ती, भंडीशेगाव आणि बाजीराव विहीर या ठिकाणी विश्रांती होईल. बाजीराव विहीर येथे उभे रिंगण होईल. शनिवार (दि. 9) रोजी दुपारी वाखरी येथे गोल रिंगण होईल. त्यानंतर पालखी पंढरपूरकडे रवाना होईल. रविवार (दि. 10) रोजी एकादशीनिमित्त पालखी पंढरपूरला विसावेल. पुढील पाच दिवस तिथे राहिल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला निघेल.

शिपिंग कॉर्पोरेशनच्या विक्रीसाठी सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या जाणार

लोणंद, फलटण येथे यंदा माऊलींचा दोन दिवस मुक्काम

आळंदी : श्रीकांत बोरावके 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा दोन वर्षांनंतर पुन्हा पायी मार्गस्थ होणार असून, 21 जून रोजी आळंदी येथून माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख डॉ. विकास ढगे पाटील यांनी दिली आहे.

Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टॅंकर पलटी; ३ जणांचा मृत्यू

यंदा तिथी वृद्धी झाल्याने लोणंद, फलटण येथे दोन दिवस मुक्काम वाढला आहे. 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवेल. रात्री आळंदीतच आजोळघरी दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील. 22 जून रोजी सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल व सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. 23 जून रोजीदेखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. 24 व 25 जून रोजी सासवड येथे दोन दिवस मुक्कामी राहील. त्यानंतर रविवारी 26 जून रोजी जेजुरी, 27 जून रोजी वाल्हे, 28 व 29 जून रोजी लोणंद येथे दोन दिवस मुक्कामी राहील. 30 जून रोजी तरडगाव, 1 व 2 जुलै रोजी फलटण येथे दोन दिवस मुक्काम असेल. 3 जुलै रोजी बरड, 4 जुलै रोजी नातेपुते, 5 जुलै रोजी माळशिरस, 6 जुलै रोजी वेळापूर, 7 जुलै रोजी भंडीशेगाव, शुक्रवारी 8 जुलै रोजी वाखारी, तर 9 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहचेल.

देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम; सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांवर

वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा

10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण; तर पुरंदावडे (सदाशिवनगर), पानीव पाटी, ठाकूरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे. दोन वर्षे पायी वारी झाली नसल्याने यंदाच्या सोहळ्याला मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित राहणार असण्याची शक्यता व्यक्त होत असून, गर्दीच्या अनुषंगाने प्रशासन व देवस्थानने नियोजन सुरू केले आहे.

Back to top button