

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेयसीला मांडीवर बसवून प्रियकराने बेंगळुरूमध्ये फेरफटका मारल्याचे समोर आहे. शहरातील विमानतळ रोडवरच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर एका वापरकर्त्यांने बेंगळुरू पोलिसांना याबाबत टॅग केले असून या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी याची दखल घेऊन धोकादायकपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
17 मे रोजी एक जोडपे बेंगळुरूच्या रस्त्यावर बाईकवरून जाता दिसले. आश्चर्याची बाब म्हणजे चालत्या बाईकवर चालक असणा-या प्रियकराच्या मांडीवर बसवून त्याची प्रेयसी मोकळेपणाने रोमान्स करत होती. या मर्गावरून जाणा-या इतर प्रवाशांनी त्यांचा हा धोकादायक प्रवास चित्रीत केला. काहींनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला आणि पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिस ॲक़्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी स्टंबाजी करणा-या प्रियकर आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलंबरसेन (21) असे प्रियकराचे नाव आहे, तो कॅब चालक आणि शामपुरा येथील एमव्ही लेआउटचा रहिवासी आहे. त्याच्यावर भादंवि कलम 279 आयपीसी आणि कलम 184, 189, 129, 177 आयएमव्ही कायद्यान्वये सीआरएम क्र. 80/24 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे वाहन जप्त करण्यात आले असून 107 सीआरपीसी अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकारानंतर बेंगळुरू पोलिसांनी सोशल मीडियावरून इतर बाईक स्वारांना इशारा दिला आहे. त्यांनी पोस्ट म्हटलं की, 'स्टंट करणा-या बाईक स्वारांनो, रस्ता हा स्टंटसाठी स्टेज नाही! कृपया ते तुमच्यासह प्रत्येकासाठी सुरक्षित ठेवा. चला जबाबदारीने वाहन चालवूया.'
बेंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात जीवघेणे अपघात दुचाकीस्वारांमुळे होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यातच विमानतळ रोड हा स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे दुचाकी वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. या प्रकरणी अनेक तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शोधण्यासाठी या रस्त्यावर एआय कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.