शिपिंग कॉर्पोरेशनच्या विक्रीसाठी सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या जाणार | पुढारी

शिपिंग कॉर्पोरेशनच्या विक्रीसाठी सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या जाणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी कंपनीच्या विक्रीसाठी येत्या सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निविदा मागविण्यापूर्वी जलवाहतूक उद्योगाशी संबंधित नसलेली मालमत्ता मूळ कंपनीपासून वेगळी केली जाणार आहे.

एअर इंडियाप्रमाणे शिपिंग कॉर्पोरेशनच्या सर्व समभागांची विक्री सरकारकडून केली जाणार असून निविदा जिंकणाऱ्याला व्यवस्थापन अधिकार देखील सुपूर्द केले जाणार आहेत. खासगीकरणापूर्वी मुंबईतील शिपिंग हाऊस, कंपनीचा पवई येथील मेरीटाईम ट्रेनिंग विभाग तसेच इतर मालमत्ता वेगळी केली जाणार आहे. शिपिंग कॉर्पोरेशनची एकूण नॉन कोअर मालमत्ता सुमारे २ हजार ३९२ कोटी रुपयांची आहे. शिपिंग कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात नॉन कोअर मालमत्ता वेगळी करण्यास मंजुरी दिली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button