Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टॅंकर पलटी; ३ जणांचा मृत्यू | पुढारी

Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टॅंकर पलटी; ३ जणांचा मृत्यू

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलीन गॅस टॅंकर पलटी झाल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईला हा टॅंकर जात होता. मात्र, मार्गातच हा टॅंकर पलटी झाल्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक थांबविण्यात आली होती. खोपोली एक्झिटजवळच्या उतरावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला.

चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा टॅंकर पुणे लेनवर येऊन आदळला. त्यामुळे इतर गाड्या येऊन टॅंकरला धडकून भीषण अपघात झाला. त्यातच ३ जणांचा मृत्यू झाला आहे. बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.

या अपघातात सुदैवाने गॅसची गळती झाली नाही. सध्या टॅंकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाली आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालेले असून तिथे पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. या अपघातात टॅंकरचा चालकदेखील गंभीर जखमी झालेला आहे. त्याला रुग्णालयान हालविण्यात आले आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.


पहा व्हिडीओ : दिंडोरी : बोपेगाव इथंले गावकरी जपतायत बोहडा उत्सवाची परंपरा

Back to top button