देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम; सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांवर | पुढारी

देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम; सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांवर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशातील कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत गत चोवीस तासांत ३२०७ ने वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी देण्यात आली. या कालावधीत २९ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ३४१० रूग्ण बरे झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार ४०३ वर गेली आहे.

Market : सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर, सोने आणखी महागले!

सक्रिय रुग्णांच्या संख्येत किरकोळ प्रमाणात घट झाली असली तरी नवीन रुग्णसंख्या वाढीचा आकडा मात्र अजून चढाच आहे. याआधी ७ मे रोजी नवीन रुग्ण संख्येत ३ हजार ८०५ ने भर पडली होती. ६ मे च्या तुलनेत हा आकडा ७.३ टक्क्याने जास्त होता. देशाची राजधानी दिल्लीत रविवारी १४२२ रुग्णांची भर पडली असून संक्रमण दर ५.३४ टक्क्यांवर गेला आहे. सुदैवाने दिल्लीत रविवारी कोणाचाही मृत्यू झाला नाही. महानगरात चोवीस तासात २६ हजार ६४७ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ९३९ वर गेली आहे. यातील १७७ रुग्ण दवाखान्यात असून बाकीचे होम आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ४ कोटी ३१ लाख ५ हजार ४०१ वर गेली असून मृतांचा आकडा ५ लाख २४ हजार ९३ वर गेला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button