priyanka chopra : प्रियांकाच्या लेकीचा पहिला फोटो आला समोर

priyanka chopra : प्रियांकाच्या लेकीचा पहिला फोटो आला समोर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे गेल्या जानेवारी महिन्यात सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. दोघांनी याबाबतची गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच चाहते त्याच्या बाळाला पाहण्याची आतुरतेने वाट पाहू लागले. याच दरम्यान प्रियांकानं आपल्या बाळाचे मालती मेरी चोप्रा जोनस असे नामकरण केलं. तर सध्या प्रियांकाने आपल्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर दाखविली आहे.

प्रियांका चोप्रा ( priyanka chopra ) आणि निक जोनास यांनी 'मदर्स डे' च्या निमित्ताने आणि मालती १०० दिवसांनी हॉस्पिटलमधून सुखरूप घरी आल्याने अमेरिकेत खास पूजा ठेवली आहे. याच दरम्यान प्रियांकानं तिची लाडकी मुलगी (मालती)ची पहिली झलक दाखविली. या फोटोत प्रियांकाने आपल्या मुलीला छातीला कवटाळले आहे. तर निक प्रियांकाच्या शेजारी बसलेला असून तो मालतीकडे प्रेमाने पाहताना दिसतोय. तर मालतीच्या चेहऱ्यावर एक हार्ट ईमोजी दाखवून चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आहे.

यामुळे शेअर केलेल्या फोटोत खास करून मालतीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही, परंतु, तिची एक झलक दिसतेय. हा फोटो प्रियांकाने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. प्रियांकाने मालती हॉस्पिटलमधून १०० दिवसांनी घरी सुखरूप परतल्याने तिचे स्वागत केले आहे. याशिवाय तिने हा फोटोच्या कॅप्शनमधून डॉक्टरांचे आभारदेखील मानले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रियांकानं लिहिले आहे की. 'मदर्स डेच्या दिवशी आम्ही मदत करू शकत नाही. गेल्या काही महिन्यांत आम्ही खूपच चढ- उताराचे दिवस पाहिले आहेत. आता मागे वळून पाहण्यात डोळे भरून येतात. कारण नॅशनल इंटेन्सिव्ह केअर युनिट (NICU) मध्ये आम्ही मुलासोबत १०० दिवस घालवले आहेत. या दिवसांतील प्रवास खूपच आव्हानात्मक होता. आमचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी अनमोल होता. अथक प्रयत्नानंतर आमची मुलगी घरी परतली आहे. आता आमच्या परिवाराला आनंद झाला आहे. मुलीला सुखरूप घऱी आणण्यासाठी डॉक्टारांनी खूपच कष्ट घेतले आहेत. यासाठी आम्ही लॉस एंजेलिसमधील Rady Children's La Jolla and Cedar Sinai हॉस्पिटलमधील प्रत्येक डॉक्टर, परिचारिका आणि तज्ज्ञांचे मी आभार मानते. आमचा पुढचा टप्पा सुरू होत आहे. आमची मुलगा खूप मजबूत आहे. आई आणि बाबा मालतीवर खूप प्रेम करत आहेत.'

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्सनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात प्रियांकाची बहीण परिणिती चोप्रा, प्रीती झिंटा, दिया मिर्झा, रणवीर सिंग आणि महिमा चौधरी यासारख्या अनेक स्टार्सनी सर्वांसाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील कॉमेन्टस करताना शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. प्रियांकाने निकशी २०१८ मध्ये लग्न केले आहे. दोघांचा विवाह जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये झाला. प्रियांका आणि निक जोनस यांनी हिंदू आणि ख्रिस्त रितीरिवाजानुसार लग्न केलं होते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news