रत्नागिरी : खेड येथील नदीत पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू | पुढारी

रत्नागिरी : खेड येथील नदीत पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

खेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खाडी पट्ट्यात तुंबाड गावानजीक नदीमध्ये सोमवारी (दि.२०) दुपारी पोहायला गेलेल्या पाच तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. सौरभ हरिश्चंद्र नाचारे (वय १९, रा.पन्हाळजे) आणि अंकेश संतोष भागणे (वय २०, रा. बहिरावली) अशी या तरूणांची नावे आहेत.

उन्हाने हैराण झालेले खेड तालुक्यातील तुंबाड परिसरातील पाच तरुण आज दुपारी गावाजवळील जगबुडी नदीत पोहायला गेले होते. यातील दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.  ही बाब सोबत असलेल्या मित्रांच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला. त्या दोघांनी जीव गमावला. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button