#Cloudburst : जम्मूमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी; चार ठार, ४० जण बेपत्ता | पुढारी

#Cloudburst : जम्मूमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी; चार ठार, ४० जण बेपत्ता

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन : जम्मूमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी (#Cloudburst) झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ढगफुटीमुळे (#Cloudburst) ४० जण बेपत्ता झाल्याचे समजते.

अधिक वाचा:

ढगफुटीमुळे होंचर डच्चन या गावातील शेती वाहून गेली असून खराब हवामानामुळे रेस्क्यू टीमला घटनास्थळावर जाण्यास अडचणी येत आहेत.

ढगफुटीमुळे अनेकजण जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाला पाचारण केले आहे.

किश्तवाडच्या उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ढगफुटीमुळे अचानक मोठा पूर आला. त्यामुळे अनेकजण वाहून गेल्याची भीती आहे. जखमींना रस्तेमार्गे नेणे खूप अवघड आहे.

अधिक वाचा:

खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. बचाव कार्यात वेग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एसडीआरएफची पथके बचावकार्यत व्यस्त आहेत.

ढगफुटीमुळे किश्तवाडमधील ९ घरे जमीनदोस्त झाली असून त्यातील चार जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अन्य बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

अधिक वाचा:

महाराष्ट्रात एकाच दिवशी तब्बल १३ ठिकाणी ढगफुटी

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात ढगफुटीच्या घटना घडल्या होत्या. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल १३ ठिकाणी ढगफुटी झाल्या.

आजपर्यंत एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली.

आजवरचा हा उच्चांक असल्याचे हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

हवामान विभागांतील रडारची संख्या ग्रामीण भागात कमी असल्याने ढगफुटी मोजताच येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे वाचले का

पहा व्हिडिओ

 

Back to top button