होमगार्ड महासंचालक परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस | पुढारी

होमगार्ड महासंचालक परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस

अंधेरी, पुढारी ऑनलाईन: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्ड महासंचालक परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस लागू करण्यात आली आहे. होमगार्ड महासंचालक परमबीर सिंग यांना यामुळे आता परदेशात जाता येणार नाही.

परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाणे आणि मुंबईत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक वाचा

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात वसुलीचा आरोप केल्यानंतर सिंग यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

गुन्हे दाखल झाल्यानंतर परमबीर सिंग मुंबईत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

त्याची माहिती विमानतळासह अन्य ठिकाणी देण्यात आली आहे.

अधिक वाचा

परमबीर सिंग यांनी देश सोडून बाहेर जाऊ नयेत, परदेशात जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

खंडणी आणि अन्य आरोपांखाली गुन्ह्यांबाबत परमबीर सिंग यांना न्यायालयाने २८ जुलै पर्यंत दिलासा दिला होता.

या त्याची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबई पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा:

 

त्याच बरोबर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त गुन्हे अकबर पठाण यांची बदली सशस्त्र विभाग नायगाव येथे करण्यात आली असून एसीपी पाटील यांची सुद्धा बदली केली आहे.

हेही वाचा

Back to top button