Lok Sabha Election 2024 : देशात ‘भाजप’साठी परिस्थिती प्रतिकूल, पंतप्रधान पदाचा चेहरा बदलेल?- ॲड. प्रकाश आंबेडकर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : देशात 'भाजप'साठी परिस्थिती प्रतिकूल, पंतप्रधान पदाचा चेहरा बदलेल?- ॲड. प्रकाश आंबेडकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशभरातील काही मतदारसंघात दोन टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे.  पुढे १ जूनपर्यंत आणखी ५ टप्प्यांत देशात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘देशभरात भाजपसाठी परिस्थिती पोषक नसून, पंतप्रधान पदाचा चेहरा बदलू शकतो’, असे भाकीत केले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Lok Sabha Election 2024)

वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, पं. बंगाल ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे. बिहारमध्येदेखील जनतेचा मूड नितीशकुमारांच्या विरोधात आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातदेखील काही गोष्टी भाजपच्या बाजूने नाहीत, असेही ते म्हणाले.

भाजपसाठी परिस्थिती प्रतिकूल नाही, मी आधीच सांगितले आहे की, भाजपला ४०० पारचे लक्ष्य गाठता येणार नाही. जे खरे विश्लेषण करतात त्यांनी भाजपला २०० च्या वर कधीच जागा दिल्या नाहीत. सत्ता बाजारात भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत, त्याचे काही हे संकेत आहेत, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीनंतर सरकार कोण स्थापन करेल? हे सांगणे कठीण आहे. ते पक्षातील नेत्यांवर अवलंबून असेल. कारण ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतील. पण आगामी लोकसभेच्या पंतप्रधानांचा चेहरा बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेस मुस्लिमांना तिकीट देणार नाही. असेदेखील आम्ही गेल्या काही काळापासून म्हणत असल्याचेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Election 2024)

Back to top button