नाशिक : सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर तब्बल एक तास ग्रामस्थांचा रास्तारोको | पुढारी

नाशिक : सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर तब्बल एक तास ग्रामस्थांचा रास्तारोको

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात गुरुवार, दि. 23 दुपारी एका महिलेला भरधाव वाहनाने उडवले असता तत्काळ सदर महिलेला मदत करत ग्रामस्थांनी येथील मार्गावर गतीरोधकासाठी रस्ता रोको केला.

नांदुरी गावातील रस्त्यावर अनेक अपघात झालेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नांदुरी ग्रामपंचायतीने अनेकदा गतिरोधकसाठी पत्रव्यवहार केला असून अद्यापही गतिरोधक टाकलेले नाहीत. गतिरोधक टाकण्यासाठी अजून किती बळी द्यावे लागतील अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. तसेच येथील राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात होत असतात. या अपघातात अनेकांचे प्राणही गेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत गतीरोधक टाकावे, अशी मागणी भाऊ कानडे यांनी केली. रास्तारोको केल्यामुळे संबंधित रास्तारोको मध्ये एका ग्रामस्थाने तहसिलदार यांना संपर्क केला असता तहसिलदार बी. ए. कापसे व कळवण पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास कळवले. त्यांनी तत्काळ पाहणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ पाहणी करत गतीरोधकसाठी (स्पिडब्रेकर) तत्काळ टाकणार असल्याचे सांगितले. यावेळी नांदुरी गावातील ग्रामस्थांसह महिलाही मोठ्या संख्येने या रास्तारोकोत सहभागी झाल्या होत्या. एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून असे अपघात वारंवार होत आहेत. या पार्श्वभूमीवर अपघात होऊ नये यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सप्तशुंगी गडाच्या पायथ्याशी असलेले महा.मार्गावरील नांदुरी गाव असुन या ठिकाणी धुळे नाशिक रस्त्यावर सतत अपघात होत असतात आज ही अपघात होऊन एक महिला जखमी झाली याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पञ देऊन ही याकडे कानाडोळा करीत असल्याने आज रस्ता रोक करावा लागला. – किरण आहिरे, सदस्य, ग्रामपंचायत नांदुरी.

हेही वाचा:

Back to top button