टिकैत म्‍हणाले, लखीमपूर हिंसाचारात भाजप कार्यकर्त्याच्या मृत्यूचा दावा खोटा | पुढारी

टिकैत म्‍हणाले, लखीमपूर हिंसाचारात भाजप कार्यकर्त्याच्या मृत्यूचा दावा खोटा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्‍या हिंसाचारावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप हाेत आहेत. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यानंतर आता भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

राकेश टिकैत म्हणाले की, “ज्यांची गुंडगिरीची पार्श्वभूमी आहे, त्यांचे चरित्रही पाहायला हवे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे, त्यांना गृहमंत्री केल्यावर देशाची अवस्था हीच आणि अशीच होणार आहे”, अशी टीका त्‍यांनी केली. या हिंसाचारात भाजप कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला आहे, असं सांगितलं जात आहे. त्यावर राकेश टिकैत म्हणाले की, “हा दावा खोटा आहे. त्यात भाजप कार्यकर्ते मुळीच नव्हते. ते वाहनाने चिरडायला गेले होते. मात्र, वाहनच उलटले. काही झाले तरी असे व्हायला नको होते”, असे मत राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.

लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणातील मृतांची संख्या ९ झाली आहे. रविवारच्या हिंसाचारात ८ जण मरण पावले होते. लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेपुरता शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये तोडगा निघाला आहे. सरकारने मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे.

दरम्यान, जमावबंदी लागू असताना लखीमपुरच्या दिशेने निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य नेत्यांनाही त्यांच्या घरातच अटक करण्यात आली आहे. लखीमपुरला जाताना पोलिसांनी रोखताच अखिलेश यादव त्यांनी लखनौमध्ये रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पहा व्‍हिडिओ : भेटरूपी ऐतिहासिक शस्त्र बनवतात पुण्यातील सत्यजीत वैद्य

हेही वाचलंत का?

Back to top button