Drugs Case : शाहरुखच्या आधी 'या' सुपरस्टारचा मुलगा गेला होता जेलमध्ये! - पुढारी

Drugs Case : शाहरुखच्या आधी 'या' सुपरस्टारचा मुलगा गेला होता जेलमध्ये!

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी (Drugs Case) अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक झाली. आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांच्या कोठडीमध्ये न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. तर, अन्य पाच आरोपींनाही न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. एनसीबीने क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पुरता बेरंग केला असला तरी हे प्रकरण आता खरे रंगात आलेले दिसते. सोमवारी कॉर्डेलिया क्रूझ पुन्हा मुंबईला येताच तिच्यावर छापा टाकत एनसीबीने आणखी आठ जणांना अटक केली आणि ड्रग्ज जप्‍त केले. या प्रकरणी देशाच्या विविध भागांत छापे टाकण्यात येत आहेत.

आर्यन खान याच्या अटकेनंतर शाहरुख खानने त्याच्या पठान चित्रपटाचे शुटिंग रद्द केले आहे. तो या चित्रपटाच्या शुटिंगसाठी दीपिका पादुकोण सोबत स्पेनला जाणार होता. जोपर्यंत आर्यन खान सुटत नाही तोपर्यंत शाहरुख मुंबईतच राहणार असल्याचे समजते.
एखाद्या सुपरस्टारच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात ((Drugs Case) अटक होणे हे पहिल्यांदा घडलेले नाही. याआधी दिग्गज अभिनेता जॅकी चॅन (Jackie Chan) याच्या मुलाला २०१४ मध्ये ड्रग्जचे सेवन आणि ड्रग्जचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून दिल्याबद्दल अटक झाली होती. १४ ऑगस्ट २०१४ रोजी जेसी चॅनला तैवानी चित्रपट अभिनेता काई को याच्या सोबत मारियुआना ड्रग्जचे सेवन करताना पकडले होते. त्यानंतर चॅनच्या बिजिंगमधील घरावर छापा मारला होता. या कारवाईदरम्यान १०० ग्रॅम मारियुआना जप्त करण्यात आले होते. काई याच्या अटकेनंतर त्याची १४ दिवसांनी सुटका झाली. त्याच्यावर ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप होता. मात्र जेसी चॅनला ६ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार युआन दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

मुलाच्या सुटकेसाठी जॅकीने आपल्या प्रभावाचा वापर केला नाही…

जेसी पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर या प्रकरणाची ९ जानेवारी २०१५ रोजी सुनावणी सुरु झाली होती. जेसीला ज्यावेळी ६ महिन्यांची शिक्षा सुनावली होती त्यावेळी त्याने अगोदरच पाच महिने तुरुंगात काढले होते. त्यामुळे त्याची १३ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या रात्री तुरुंगातून सुटका झाली. पण जॅकी चॅन आपल्या मुलाच्या सुटकेसाठी कोर्टाची पायरी चढला नाही. तसेच त्याने शिक्षा कमी करण्यासाठी आपल्या प्रभावाची वापर केला नाही.

२००९ मध्ये चिनी पोलिसांनी चॅकी चॅनला नार्कोटिक्स कंट्रोलचा अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले होते. ड्रग्ज प्रकरणी मुलाच्या अटकेनंतर जॅकीने जाहीर माफी मागितली होती. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले होते की आपल्या मुलाच्या वाईट वागण्यामुळे मी खूप नाराज आहे. मला लाजिरवाणे वाटत असून मी खूप निराश आहे.

मुलाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर जेसी चॅनने पत्रकार परिषद बोलावून सर्वांची माफी मागितली होती. कायद्याचे उल्लंघन केल्याची कबुली त्याने दिली होती. आपण तुरुंगात गेल्याने ज्यांनी माझ्यासोबत केले त्यांचे नुकसान झाल्याचे त्याने म्हटले होते. येथून पुढे एक चांगला नागरिक म्हणून आपली वागणूक राहिल, अशी ग्वाही त्याने मीडियासमोर दिली होती.

मुलाने ड्रग्ज घेतल्यानंतर जॅकीने घेतला होता मोठा निर्णय

असे सांगितले जाते की या घटनेनंतर काही दिवसांनी जेसी आपले वडील जॅकी चॅन यांना भेटला. मात्र, दोघांमधील नात्यांत नेहमीच दुरावा राहिला. २०११ मधील एका पुरस्कार सोहळ्यात जॅकी चॅनने घोषणा केली होती आपल्या हयातीनंतर त्याच्या संपत्तीतील अर्धा हिस्सा एखाद्या चॅरिटीसाठी दान करावा. याचाच अर्थ असा की जॅकीच्या संपत्तीतील अर्धा हिस्सा त्याच्या मुलाला मिळणार नाही. आपल्या मुलाबद्दल जॅकीने म्हटले होते, ”जर त्याच्यात क्षमता असेल तर त्याने त्याच्या मेहनतीवर पैसा कमवावा. जर त्याच्यात क्षमता नसेल तर तो माझ्या पैशावर मौजमजा करत राहील.”

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जेव्हा आपल्या माणसाचं बोलणं न बोलताच आपल्याला कळतं.. | Swami Motors |Pre-owned Cars

Back to top button