server down whats app facebook instagram तब्बल ६ तास ‘डाऊन’; भारतातील ५३ कोटी युजर्संना फटका | पुढारी

server down whats app facebook instagram तब्बल ६ तास ‘डाऊन’; भारतातील ५३ कोटी युजर्संना फटका

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जगभरातील फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा सोमवारी रात्री तब्बल ६ तासांहून अधिक काळ बंद पडली होती. यामुळे वापरकर्त्यांना संदेश पाठवण्यास, व्हिडिओ कॉल, ग्रुप चॅट करण्यास अडचणी येत होत्या. याचा फटका भारतातील सुमारे ५३ कोटी व्हॉटस् अ‍ॅपचे तर ४१ कोटी फेसबुक युजर्सना बसला. यामागे सायबर हल्ल्याचा संशय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. (server down, whats app, facebook, instagram)

server down, whats app, facebook, instagram रात्री ९. ३० पासून सेवा बंद

व्हॉटस् अ‍ॅप डाऊन झाल्याने नेटकर्‍यांनी ट्विटरवर ‘व्हॉटस् अ‍ॅप डाऊन’चा ट्रेंड सुरू केला. रात्री ९.३० च्या सुमारास व्हॉटस् अ‍ॅप बंद झाले.  पहाटे पर्यंत या सेवा बंदच होत्या. नेटकर्‍यांना फेसबुक, इन्स्टाग्रामवरही पोस्ट अपलोड करण्यास अडचणी येत होत्या. जगभरातील कोट्यवधी युजर्संना सर्व्हर डाऊनचा फटका बसला आहे.

दरम्यान, नेटकर्‍यांनी फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप डाऊन झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर यावर काम सुरू असल्याचे संदेश फेसबुककडून देण्यात आला.

whats app कडून दिलगीरी

व्हॉट्स अॅपने युजर्सना सांगितले की, आम्ही तुम्हाला सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लवकरच आमची सेवा सुरू होईल. बराच वेळ आमची सेवा बंद असल्याने आम्ही तुम्हा सर्वांचे माफी मागतो.

सर्व्हर डाऊन झाल्याबद्दल जी काही कारणं समोर येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील. काही लोकांकडून आम्हाला या सेवा काम करत नसल्याच्या तक्रार प्राप्त झाल्या. त्यानंतर आम्ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे ट्विटरच्या माध्यमातून व्हॉट्स अॅपकडून सांगण्यात आले आहे.

व्हॉट्स अॅपसारखे अ‍ॅप्स ठप्प होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी मार्च २०२१ मध्ये असाच एरर आला होता. नेटकऱ्यांनी ट्विटरवर मेसेज पोस्ट करत व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक बंद असल्याची माहिती दिली. रात्रीपासून अडचण येत असल्याचे सांगण्यात बोलले जात होते.

यानंतर एकमेव ट्विटर सुरू असल्याने नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस पाडला. वापरकर्ते व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन असल्याने ट्विटरवर पोस्ट करून झुकेरबर्ग यांच्या वेगवेगळ्या मीम्स तयार करत होते.

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button