priyanka gandhi : ‘गुन्‍हा दाखल नसतानाही मी २८ तासांनंतरही पोलिसांच्या ताब्यातच’  | पुढारी

priyanka gandhi : 'गुन्‍हा दाखल नसतानाही मी २८ तासांनंतरही पोलिसांच्या ताब्यातच' 

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखीमपूर खेरी हिंसाचारावरून काॅंग्रेस नेत्या प्रियांका गांधी ( priyanka gandhi ) यांनी भाजप सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे. “नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही ऑर्डर आणि एफआयआरशिवाय मला मागील २८ तासांपासून ताब्यात घेतलेलं आहे. अन्नदात्याला गाडीखाली चिरडणाऱ्याला अजूनही अटक का केली नाही.?”, असा प्रश्न प्रियांका गांधी
( priyanka gandhi ) यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही शेतकऱ्यांचा आवाज दडपू देणार नाही

लखीमपूर खेरी हिंसाचारात शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचारांवर प्रियांका गांधी ( priyanka gandhi ) यांनी म्‍हटलं आहे की, “लखीमपुरची घटना सांगते की, भाजप सरकार शेतकऱ्यांवरील अत्याचार कोणत्या टोकापर्यंत नेऊ शकतो; पण आम्ही शेतकऱ्यांचा आवाज दडपू देणार नाही. भाजप सरकारचे शेतकर्‍यांविराेधात सुरु असलेले कारस्थानं यशस्वी होऊ देणार नाही.”

भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्याची तत्परता दाखवावी

“लखीमपुरमध्ये राजकीय तणावासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांचा मुलगा जबाबदार आहे. भाजप सरकार त्यांना का वाचवत आहे? या सरकारने आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्याची तत्परता दाखवावी. हे भाजप सरकार शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचं राजकारण करत आहे”, असा आराेपही प्रियांका गांधी यांनी केला.

लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणातील मृतांची संख्या आता ९ झाली आहे. रविवारच्या हिंसाचारात ८ जण ठार झाले हाेते. लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेपुरता शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये तोडगा निघाला आहे. सरकारने मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे.

दरम्यान, जमावबंदी लागू असताना लखीमपुरच्या दिशेने निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक अन्य नेत्यांना त्यांच्या घरातच अटक करण्यात आली आहे. लखीमपुरला जाताना पोलिसांनी रोखताच अखिलेश यादव त्यांनी लखनौमध्ये रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते.

हेही वाचलं का?

पहा व्हिडीओ : दै. पुढारीची पुण्यातील वाचकांसाठी सर्वांत मोठी योजना : पुढारी उत्सव

Back to top button