Beed : चारा खाल्ला म्हशीने पण मार खाल्ला शेतमालकाने | पुढारी

Beed : चारा खाल्ला म्हशीने पण मार खाल्ला शेतमालकाने

केज; गौतम बचुटे : केज तालुक्यात जिवाचिवाडी येथे शेतातील पिकात म्हैस चारु नको म्हटल्यानंतर  म्हशीच्या मालकाने शेत मालकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली. चारा खाल्ला म्हशीने अन् मार खाल्ला शेत मालकाने असा प्रकार या प्रकरणामधून दिसून आला आहे. (Beed)

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २६ रोजी राजेभाऊ चौरे यांच्या शेतात संदीप चौरे हे म्हैस होते. यावेळी राजेभाऊ चौरे यांनी त्यांना माझ्या शेतात म्हैस चारू नको असे सांगितले. त्यावरून दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:०० च्या सुमारास राजेभाऊ चौरे यांच्या घरासमोर संदीप चौरे, लुकेश चौरे, लक्ष्मण चौरे यांनी राजेभाऊ दादाराव चौरे यास कुऱ्हाडीच्या दांड्याने हातावर, कंबरेवर आणि मांडीवर मारहाण केली. तसेच आम्हाला येथे जनावरे चारु नका असे का म्हणालास? असा जाब विचारत शिवीगाळ केली. पोलीस स्टेशनला तक्रार दिलीस तर तुला आम्ही जीवे मारुन टाकु अशी धमकी देखील त्यांनी दिली दिली. (Beed)

या प्रकरणी राजेभाऊ दादाराव चौरे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सर्वांच्या विरुद्ध गु. र. नं. ४८८/२०२२ भा. दं. वि. ३२४,३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button