उपचारादरम्यान फोटो काढू नका म्हणताच एकास बेदम मारहाण | पुढारी

उपचारादरम्यान फोटो काढू नका म्हणताच एकास बेदम मारहाण

केज, पुढारी वृत्तसेवा :– रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू असताना फोटो काढू नको असे म्हणल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांनी एकास लाथा बुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, शिवकुमार मस्के यांच्यावर केज येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमेवर टाके घेण्यात येत होते. त्याचे धिरज गोपाळराव मस्के हा मोबाईलमध्ये फोटो काढू लागला. यानंतर मुंबई येथे नौकरी करीत असलेले सिद्धार्थ संपतराव वाघमारे यांनी त्यांना फोटो काढू नका, असे म्हणून विरोध केला. त्याचा राग येऊन धिरज गोपाळराव मस्के आणि इतर चार ते पाच जणांनी सिध्दार्थ वाघमारे यास उपजिल्हा रुग्णालयाच्या पार्किंग मधील रिकाम्या जागेत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

सिद्धार्थ वाघमारे यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून धिरज मस्के आणि त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध दि. २६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button